सार्वजनिक व घरगुती पर्यावरण पूरक गणपती सजावट स्पर्धा
स्पर्धेसाठी नोंदणी करापरंपरा जपून आणि पर्यावरणाचे रक्षण करून गणेशोत्सव जबाबदारीने साजरा करण्यासाठी अलिबाग नगर परिषद कटिबद्ध आहे.
श्री गणेशाची मूर्ती लाल मातीची किंवा शाडूची असावी.
पर्यावरणपूरक वारसा नव्या पिढीला देत आपल्या घरातील लहानग्यांच्या हस्ते मातीची मूर्ती घडवून त्याचीच प्रतिष्ठापना करावी.
मूर्तींना शक्यतो नैसर्गिक रंगच लावावेत.
घरातील मखर, आरास, सजावट हे कापड, कागद किंवा फुलांचे करावे.
डीजे टाळून आपल्या इष्टदेवतेची आराधना मंगलमय संगीताने व कमी आवाजात करावी.
नैसर्गिक जलस्त्रोतांचे प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीने घरीच एका मोठ्या ड्रममध्ये पाण्यात मंगलद्रव्ये घालून त्यामध्ये श्रींचे विसर्जन करावे.
गणेश विसर्जनाच्या वेळेस आणलेले निर्माल्य हे निर्माल्य कलशातच कागदी पिशवीतून टाकावे.
मागील वर्षातील रंगतदार उत्सवाची झलक पाहा.